
अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या (Amravati-municipal-corporation) स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमशी (AIMIM) युती केली आहे.
माहितीनुसार , या संभाव्य आघाडीमुळे भाजपाकडून जोरदार टीका झाली आहे. यापूर्वी शिवसेना आणि एआयएमआयएम हे दोघेही कट्टर प्रतिस्पर्धी होते आणि त्यांच्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात अजूनही अशी स्थिती कायम असल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्ये शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी युतीची घोषणा केल्यानंतर ओवेसी यांनी “त्यांना आधी निकाह (लग्न) करू द्या”असे सांगून पक्षांची खिल्ली उडविली होती. युतीला पाठिंबा देण्यास त्यांनी नकारही दिला होता.
Source-Tv9marathi
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला