नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका – नारायण राणे

Narayan Rane-uddhav thackeray

सिंधुदुर्ग : भाजपचे (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला (Shivsena) लक्ष्य केले आहे. दोन दिवसांपूर्वी नाणारमधील (Nanar project) काही लोकांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिलं. त्यात ८० टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव उद्योग आहे. दिलेला शब्द कधी मोडतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेने दुटप्पी भूमिका घेतली आहे. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे. असा घणाघाती आरोप खासदार नारायण राणे यांनी केला. तसेच जनता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आम्ही जाणार असल्याचं म्हणत त्यांनी नाणार प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

आज नारायण राणे यांनी विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. चार दिवसांपूर्वी या किल्ल्याची तटबंदी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. या पाहणी दौऱ्यात राणेंसोबत त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे हेही सोबत होते. पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, विजयदुर्ग किल्ल्याची पडझड झाली असून आपण आता पाहणी केली आहे. संबंधित मंत्र्यांशी बोलून या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार आहे. अधिवेशनात ही मागणी करणार असल्याचे यावेळी राणे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER