शिवसेनेने केला ८०० कोटींचा घोटाळा, काँग्रेसचा आरोप

मुंबई :- मुंबई मनपाच्या निवडणुकीला उशीर आहे पण प्रचारात आरोपांचा धुराळा उडणे सुरू झाले आहे. राज्यात महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने (Congress) शिवसेनेवर (Shivsena) ८०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. मनपाची निवडणूक पुढच्या वर्षी २०२२ हॊणार आहे.

हा घोटाळा मालमत्ता कराच्या वसुलीत झाल्याचा आरोप आहे. मनपातील विरोधीपक्षनेते काँग्रेसचे रवी राजा (Ravi Raja) म्हणालेत की, मालमत्ता कराच्या वसुलीत महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ७०० ते ८०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. मालमत्तांच्या ‘मापात पाप’ करुन अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला. एकट्या वरळीतच असा १०० कोटी रुपयांचा घोटाळा असेल! प्रशासनावर योग्य अंकुश न ठेवल्याने सत्ताधारी शिवसेनाच याला जबाबदार आहे, असे ते म्हणालेत.

वरळी येथील मालमत्तेचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळाऐवजी केवळ दहा टक्क्यांपर्यंतच दाखवण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांच्या ऐवजी काही लाखांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला. अनेक गिरण्यांच्या भुखंडाबाबतही असाचा घोटाळा करण्यात आला. हा प्रकार फक्त वरळीपुरता मर्यादित नसून संपूर्ण मुंबईत हे सुरू आहे. अशाप्रकारे अंदाजे ७०० ते ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. अधिकाऱ्यांनी या पैशाने स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या, असा आरोप रवी राजा यांनी केला.

एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे की, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे याप्रकरणी राजा यांनी लेखी तक्रार केली आहे. या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : …हे महाराष्ट्रात फुदकणाऱ्या भाजपावाल्यांना सांगता येईल काय?  शिवसेनेचा घणाघात 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER