शिवसेनेला शेतीतले काय कळते? फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा : निलेश राणे

Nilesh Rane & Uddhav Thackeray

रत्नागिरी : कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी मंगळवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेच्या भूमिकेचा समाचार घेतला. शेती हा काही शिवसेनेचा विषय नाही. सेनेला तेवढी अक्कलही नाही.

केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना विरोध करण्यासाठीच शिवसेनेने या विषयाची काही जाण नसूनही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला, असे वक्तव्य निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केले. राज्यात ‘भारत बंद’ आंदोलनाचा प्रभाव कुठेही दिसत नाही. शेती हा शिवसेनेचा विषय कधीही असू शकत नाही. शिवसेना केवळ विरोधाला विरोध करत आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले. शिवसेना हा कन्फ्युज पक्ष आहे.

शिवसेनेचा उतरता काळ सुरू  झाला असून त्यांची पत घसरत आहे. दिल्लीतही शिवसेनेला इज्जत उरलेली नाही. अलीकडच्या काळात शिवसेना कुठल्याही एका भूमिकेवर ठाम राहिल्याचे दिसत नाही. ते रोज नवीन खोटं बोलतात. एक दिवस महाराष्ट्राची जनता त्यांची दखल घेणे बंद करेल.

त्यामुळे राज्यात लवकरच शिवसेना हा पक्षच अदखलपात्र ठरेल. कृषी कायद्यात बदल करावा, अशी मागणी २०१० साली शरद पवार यांनीच केली होती. त्यामुळे आता या कायद्यांना त्यांच्याकडून होणारा विरोध अनाकलनीय आहे. केवळ नरेंद्र मोदींनी हा कायदा आणला म्हणून त्याला विरोध केला जात आहे. फक्त पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधातील तीव्रता जास्त आहे. इतर कुठल्याही राज्यांमध्ये तशी परिस्थिती नसल्याचा दावा राणे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER