‘शिवसेना बदनाम हुई, डार्लिंग सत्ता के लिये’ ; भाजप नेत्याचा टोला

CM Uddhav Thackeray - Ram Kadam

मुंबई : भाजप (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला आहे. सत्तेसाठी शिवसेना बदनाम झाल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे. “एक मशहूर गीत का विडंबन सोशल मीडिया पर खूब चल रहा है ! शिवसेना बदनाम हुई… डार्लिंग सत्ता के लिए ” असे ट्विट करत राम कदम यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनात वाद आता चांगलाच पेटला आहे . या प्रकरणावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत काँग्रेस नेतेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे . यावरून भाजपने ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे .

तसेच भाजपने सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाच्या तपासावरून शंका घेत सीबीआय चौकशीची मागणी करत महाविकास आघाडीला घेरले होते. सुशांतच्या मृत्युप्रकरणात अनेक बड्या व्यक्तींची नावे येत असून मुंबई पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER