शिवसेना नगरसेवक गरजूंच्या मदतीला सरसावले ; युवतीच्या वैद्यकीय उपचारांसाठी केली मदत

Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . कौटुंबिक हलाखाची परिस्थिती आणि त्यात मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च, यामुळे अडचणीत सापडलेल्या वर्पे परिवाराच्या मदतीला शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्ता कावरे व माजी नगरसेवक आसाराम (Asaram Kavre)धावून आले आहे .या सर्वांनी मिळून दोन लाखांची मदत वर्पे परिवाराला मिळवून दिली.

सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेकांचे कामधंदे बंद आहे. अशा परिस्थिती घरखर्च भागवणेही मुश्किल असताना वर्पे कुटूंबियांवर अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे या कुटूंबियांना धीर देत ऋतिका हिच्या ऑपरेशनसाठी मदत जमा केली. जमा झालेल्या मदतीतून तिचे ऑपरेशन यशस्वी होईल व ती बरी होईल तसेच यापुढेही या कुटूंबियांच्या पाठिशी आम्ही उभे राहू, असे कदम म्हणाले .

माळीवाडा येथील रहिवासी ऋतिका उत्तम वर्पे हिला डोकेदुखीच्या त्रासामुळे दवाखान्यात दाखल केल्यावर तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. वर्पे परिवाराने पैशांची कशीतरी जमवाजमव करुन मेंदूचे एक ऑपरेशन केले, परंतु दुसरे ऑपरेशन करणे आवश्यक असल्याने त्यासाठी मोठा खर्च डॉक्टरांनी सांगितला. वर्पे परिवाराची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने दुसर्‍या ऑपरेशनसाठी पैसे जमविणे त्यांना अवघड झाले होते. ही माहिती शिवसेनेचे माजी शहरप्रमुख कदम व नगरसेवक कावरे यांना समजल्यानंतर त्यांनी वर्पे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व पैशांची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर याबाबत संबंधितांना माहिती दिली.त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनी मदतीचा हात पुढे करीत सुमारे 2 लाख 8 हजार रुपये जमा करून हा मदतीचा धनादेश वर्पे परिवाराकडे सुपूर्द केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button