शिवसेनेच्या नगरसेविकेचे पद चार वर्षांनी रद्द; ‘कारण’ ठरले तिसरे अपत्य

BMC - Shivsena - Maharashtra Today

सोलापूर :- सोलापूर (Solapur) महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर (Anita Magar) यांचे नगरसेवक पद उच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहे. अनिता यांना तीन अपत्ये आहेत. शिवाय तिसरे अपत्य १२ सप्टेंबर २००१ रोजी जन्मलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियम 10 प्रमाणे अनिता मगर या अपात्र ठरतात असा दावा करत त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशी याचिका भाजपच्या भाग्यलक्ष्मी महंता यांनी दाखल केली होती.

महंता यांची याचिका योग्य ठरवत, कोर्टाने अनिता मागर यांचे  नगरसेवकपद रद्द ठरवले आहे. आधी सोलापूर कोर्टाने २०१८ मध्ये अनिता मगर यांचे  नगरसेवकपद रद्द केले होते. त्यामुळे मगर यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी १४ ऑक्टोबर २०२० रोजी पूर्ण झाली. मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता.

दरम्यान सोलापूर महापालिकेच्या (Solapur Municipal Corporation) २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक-११ मधून अनिता मगर शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. त्यांनी भाजपच्या भाग्यलक्ष्मी महंता यांना पराभूत केले होते.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेच्या नेत्याची देवेंद्र फडणवीसांशी रत्नागिरीत गुप्त भेट ;  निलेश राणेंच्या दाव्याने उलट -सुलट चर्चा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button