राष्ट्रवादीमध्ये जोरदार इनकमिंग ; नगरसेवकाने शिवबंधन तोडून हातावर बांधले ‘घड्याळ’

 अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश

Shivsena & NCP

मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेमध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे . एकीकडे भाजपाला गळती लागली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येच फोडाफोडीचे राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेवकाने पक्षा रामराम ठोकला असून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत (Namdev Bhagat) यांचा शिवसेनेला रामराम ठोकला आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या घरवापसीला काँग्रेसने नकार दिला. त्यामुळे नामदेव भगत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला (namdev-bhagat-joins-ncp ) . राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती घड्याळ बांधले .

ही बातमी पण वाचा : हर्षवर्धन पाटील यांना धक्का; भरत शहा यांचा सर्व पदांचा राजीनामा, राष्ट्रवादीच्या संपर्कात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button