शिवसेना-काँग्रेसने एकत्र मारली बाजी, भाजप-राष्ट्रवादीच्या पदरी निराशाच

Shivsena - NCP - BJP -Congress - Maharastra Today
Shivsena - NCP - BJP -Congress - Maharastra Today

मुंबई : प्रतिष्ठेच्या बनलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आज अखेर सुरेश वरपुडकर यांच्या गटाने बाजी मारली. बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे (Congress) आमदार सुरेश वरपूडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे (Shivsena) राजेश पाटील गोरेगावकर यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) यांची मतांची बेरीज ऐनवेळी फिरल्याने भाजपचे नेते रामप्रसाद बोर्डीकर यांनी या निवडणुकीमधून लक्ष काढून घेतले होते. आणि त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली.

माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांनी देखील या निवडणुकीमध्ये बँकेत सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना सोबत घेत आकडेमोडीचे गणित साधायचा प्रयत्न केला. पण ऐन वेळी हे गणित जुळून न आल्याने त्यांनी निवडणुकीमधून लक्ष काढून घेतले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यामध्ये वरपुडकर गटाने दहा तर बोर्डीकर यांच्या गटाने 9 जागावर विजय मिळवला होता. तर दोन अपक्षांनीही या निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार, वरपूडकर यांच्या गटामधून तर दोन उमेदवार भाजपा नेते बोर्डीकर यांच्या गटामधून निवडून आले होते. पण आकडे मोडीच्या गणितामध्ये, चारही राष्ट्रवादीच्या सदस्यांना घेऊन राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी यांनी अध्यक्षपदाची मागणी करत, आपला वेगळा गट उभारण्याचे प्रयत्न केले.आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये रंगात निर्माण झाली . पण ऐन वेळी मतांची आकडेवारी फिस्कटल्याने बाबाजानी यांना देखील, माघार घ्यावी लागली आणि त्यामुळे ही निवडणूक काहीशी, एकतर्फी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button