शिवसेना-काँग्रेस नाटक कंपनी; औरंगाबादच्या नामांतरण वादवरून फडणवीस यांची टीका

Devendra Fadnavis

मुंबई : औरंगाबादच्या नामांतराच्या विषयावर शिवसेना व काँग्रेसने घेतलेल्या भूमिकांवर विधानसभा विरोधी पक्षनेते फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोचरी प्रतिक्रिया दिली. “ही सर्व नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे शिवसेना व काँग्रेस ठरवून हे करत आहे. शिवसेनेने आता औरंगाबादचे संभाजीनगर करा असे म्हणायचे, म्हणजे त्यांना असे वाटते त्यांचे मतदार खुश होतील. काँग्रेसने ते करू नका असे म्हणायचे म्हणजे त्यांना वाटते त्यांचे मतदार खुश होतील. यावरून हे स्पष्टपणे लक्षात येते की, निवडणुका आल्यामुळे ही नुरा कुस्ती सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांना याबाबत कुठलेही गांभीर्य नाही. हे केवळ एक नाटक सुरू आहे.” असे फडणवीस पत्रकारपरिषदेत म्हणाले.

“मी मुख्यमंत्री होतो तेव्हा औरंगाबादच्या रस्त्यासाठी निधी दिला पण महापालिकेने तो निधी वेळेत खर्च केला नाही. मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला आणखी १०० कोटी देतो परंतु अगोदर हा निधी वापरा. परंतु अनेक दिवस ते कामाची ऑर्डर देखील काढू शकले नाहीत. १६०० कोटी रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी दिले होते. इतक्या दिवसानंतर आता त्या कामाची ऑर्डर निघाली आहे. हे काम आतापर्यत कितीतरी पुढे जायला पाहिजे होत. औरंगाबादमध्ये इतके वर्ष सत्ता असून देखील, कुठलही महत्वाचे कार्य करता न आल्याने आता अशाप्रकारची भाषा सुरू आहे. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच हे सर्व सुरू आहे.” अशी टीका फडणवीस यांनी केली.

“निवडणुकीच्या निमित्त का होईना, शिवसेनेला गुजराती समाजाची आठवण झाली, ही चागंली गोष्ट आहे. आता शिवसेनेला अजान स्पर्धा आठवायला लागली आहे.” असा टोला देखील फडणवीस यांनी मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER