मुंगेरच्या दुर्गा विसर्जन गोळीबाराबाबत भाजपाच्या तोंडाला कुलूप का ? शिवसेना

Shivsena & BJP.jpg

मुंबई : बिहारमधील मुंगेर येथे दुर्गा विसर्जनाच्या वेळी झालेल्या गोळीबाराबाबत भारतीय जनता पार्टी शांत का आहे ? असा प्रश्न शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात पालघर येथे झालेल्या दोन साधुंच्या हत्येला भाजपाने लगेच धार्मिक रंग दिला. सोमवारी रात्री मुंगेर येथे दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाच मृत्यू झाला आणि दोन दजनपेक्षा जास्त लोक जखमी झालेत, पण त्यावर भाजपा काही बोलत नाही!

हीच घटना महाराष्ट्रात किंवा पश्चिम बंगालमध्ये घडली असती तर भाजपाने आकांततांड्व केले असते. पालघर येथे सामूहिक हिंसाचारात ठार झालेल्या साधूंच्या घटनेला भाजपा धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न का करत आहे आणि मुंगेच्या घटनेबाबत मूग गिळून का आहे? मुंगेर येथे झालेल्या दुर्गेच्या अवमानाबद्दल हिंदुत्वाचा बुरखा पांघरलेल्याना तिथले ‘जंगल राज’ दिसत नाही? भाजपाने धर्मनिरपेक्षतेचा चष्मा घातला आहे का?

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनीही मुंगेर प्रकरणी भाजपावर टीका केली. म्हणालेत – रालोआचे हिंदुत्व संधीसाधू आहे. पालघरमधेय साधुंची हत्या होते तेव्हा भाजप महाराष्टाच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागते पण मुंगेरच्या घटनेबाबत एक शब्दही बोलत नाही!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER