शरद पवार हे तर महाविकास आघाडीचे आधारस्तंभ ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Uddhav Thackeray & Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) आधारस्तंभ शरद पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान ८० वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जाणणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. ‘ठाकरे सरकार’ ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज असल्याचेही शिवसेनेने सामनाच्या अग्रेलखात म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER