‘जनाची नाही, किमान मनाची तरी…’ मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

shivsena-mns

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी ७ मार्चला म्हणजेच उद्या अयोध्या दौ-यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौ-यावर जाण्याची घोषणा केल्यापासून त्यांच्या दौ-यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर चक्क मुख्यमंत्र्यांची लाज काढली आहे.

महाविकास आघाडी सरकाला १०० दिवस पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत. त्यांच्या या अयोध्या दौऱ्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीकास्त्र सोडले.

“लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडिलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून चौदा वर्षे वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले. पण भरताने संधिसाधूपणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले. असा इतिहास असलेल्या अयोध्येला जाताय तेव्हा जाताना जनाची नाही, किमान मनाची तरी….शुभेच्छा” अशा आशयाचं ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्याआधी शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. गुरुवारी दुपारी कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिन्सहून शिवसैनिकांना घेऊन विशेष ट्रेन अयोध्येसाठी रवाना झाली आहे. आयआरसीटीसीच्या माध्यमातून १८ डब्यांची विशेष रेल्वेगाडी बुक करण्यात आली होती, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

अंबरनाथमधून भाजपा-मनसे युतीचा श्रीगणेशा ?


Web Title : MNS criticizes Uddhav Thackeray

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)