शिवसेनेच्या सागवे विभागातील २३ शाखाप्रमुखांचे राजीनामे

ShivSena

रत्नागिरी/प्रतिनिधी : रिफायनरी प्रकल्पाला समर्थन दिल्याबद्दल विभागप्रमुख राजा काजवे यांच्यावर शिवसेनेने कारवाई केल्याचा निषेधार्थ शिवसेनेच्या सागवे विभागातील २३ विभागप्रमुखनी आपले राजीनामे सादर केले आहेत. राजा काजवे यांच्यावर केलेल्या अन्यायकारक कारवाईमुळे आपण राजीनामे देत असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. आपले राजीनामे या २३ जणांनी तालुकाप्रमुखांकडे सुपूर्द केले आहेत.