शिवसेनेचे मुखियाही असेच ‘उद्योग’ करतात; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

Kirit Somaiya-CM Thackeray

मुंबई :- शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. यावरून सरळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्ला करताना भाजपाचे नेते किरीट सोमय्या म्हणाले – शिवसेनेचे मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत आहे. धाडीचे समर्थन करताना ते म्हणाले – सरनाईक यांनी बेनामी मालमत्ता जमवली असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

ईडी सबळ पुरावे आणि माहिती असल्याशिवाय कारवाई करत नाही. (kirit somaiya on ED raids residence Of Shiv Sena MLA Pratap Sarnaik) एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, सरनाईक यांनी बेनामी मालमत्ता जमवली असेल. मनी लॉन्ड्रिंग केली असेल किंवा चुकीच्या मार्गाने मालमत्ता जमवली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मीही सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या होत्या.

मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई करू नका, असे म्हणणे योग्य नाही. शिवसेनेचे काही नेते, ते मुंबईतील असो की इतर ठिकाणचे महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हप्ते घेतात, अशा लोकांवर कारवाई करायला नको का? असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही थेट हल्ला केला. शिवसेनेचे मुखियाही अशाच प्रकारचे उद्योग-धंदे करतात, हे सर्वांनाच माहीत आहे, असा आरोपही केला.

ईडीने आज प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घर आणि कार्यालयात तसेच सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही धाड टाकली. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. प्रताप सरनाईक हे शिवसेना प्रवक्ते, आमदार आहेत आणि  बांधकाम व्यावसायिकही आहेत. त्यांनी ‘मनी लॉन्ड्रिंग’ केली असावी म्हणूनच ईडीने ही धाड टाकली, अशी चर्चा आहे.

ही बातमी पण वाचा : काही काळेबेरे नसेल तर थयथयाट कशाला? भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER