
मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नगरसेवकांना महत्वाचा सल्ला दिला आहे . निवडणुकीआधी जनतेला दिलेला शब्द सर्वांनी पाळा, सर्व कामं करा. काही कामं राहात असतात मात्र, ती पुढील निवडणुकीवेळी पूर्ण करायची असतात. नाहीतर शिवसेनेसारखं करु नका. निवडणुकीआधी आश्वासन द्यायचं आणि पुन्हा विसरायचं. १०० युनिटपर्यंत वीज मोफत देऊ म्हणणाऱ्या शिवसेनेने (Shivsena) कोरोना काळात अवाढव्य वीजबिलं दिली, शिवाय वाहून गेलेल्या घराला अडीच हजारांचे वीजबिल दिले , अशी शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत, असे पाटील म्हणाले .
पुण्यातील उद्घाटन समारंभात शिवसेनेवर हल्लाबोल करताना पाटील म्हणाले की, शिवसेनेनं निवडणुकीआधी १०० युनिटपर्यंत वीजबिल मोफत देऊ, असं अश्वासन दिले होते . पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपलं अश्वासन पाळले नाही. करोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना सहा हजार रुपयांचं बील काढले. आमच्या कागलमध्ये तर पुरामध्ये एकाच घर वाहून गेले. त्या कुटुंबाला चक्क अडीच हजारांचे विज बिल आले . सरकारच्या या कारभारामुळे वाहून गेलेल्या घरात वीज चालू होती का? असा सवाल उपस्थित होतो.
ही बातमी पण वाचा : शिवसेना हा अस्तित्व संपत चाललेला पक्ष- चंद्रकांत पाटील
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला