हाथरस प्रकरणातील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन

Shivsena

कोल्हापूर : देशात “बेटी पढाओ, बेटी बचाओ” (Beti padho beti baccaho) चा नारा दिला जात असताना उत्तरप्रदेशात “बेटी भगाओ, बेटी जलाओ” (Beti Bhagao beti jalao) सारखी अमानवी कृत्ये घडत आहेत. महिलांवरील अत्याच्यारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिडीतेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचे काम उत्तरप्रदेश सरकार कडून होत आहे.

त्यामुळे बलात्कारातील आरोपीना पाठीशी घालणारे उत्तरप्रदेशातील सरकार बरखास्त करावे, आरोपींना फाशी द्या आणि पिडीत दलित युवतीच्या कुटुंबियांना न्याय द्या, अशी मागणी शिवसैनिकांनी (Shivsena) मंगळवारी केली. हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने केली.यानंतर हाथरस प्रकरणातील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेच्या वतीने दहन करण्यात आले.

यावेळी “बलात्काऱ्याना पाठीशी घालणाऱ्यांचा धिक्कार असो”, “बरखास्त करा, बरखास्त करा.. उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करा”, “राजीनामा द्या, राजीनामा द्या.. योगी आदित्यनाथ राजीनामा द्या”, अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला. यावेळी शहरप्रमुख श्री.रविकिरण इंगवले यांनी, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या एका विकृत अभिनेत्रीला सुरक्षा देणारे भाजप सरकार बलात्कार झालेल्या पिडीतेच्या मृतदेहावर पोलीसांकरवी अत्यसंस्कार करते, यासारखे दुर्दैवी असल्याचे सांगितले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER