शिवसेनेने जाळला कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा पुतळा

Shivsena

कोगनोळी :- बेळगाव हा कर्नाटक राज्याचा अविभाज्य भाग आहे. सूर्य-चंद्र असेपर्यंत तो आमचाच राहील, असे वक्तव्य करणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा पुतळा कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील दूधगंगा नदीजवळ कोल्हापूर जिल्हा शिवसेनेने (Shivsena) जाळला.

सीमाभागातील मराठी भाषिकांनी आज काळादिन पाळला. मूक फेरी काढण्यास शासनाने परवानगी नाकारली. या शासनाचा आम्ही धिक्कार करतो. सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव सीमाभाग आमचाच अविभाज्य भाग आहे, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सूर्य कधी उगवतो ते तरी पाहिले आहे का? त्यांची काम करण्याची पद्धत आम्हाला माहीत आहे. त्यांना आमचे आव्हान आहे, तुमच्या सीमेवर येऊन आंदोलन करत आहोत, हिंमत असेल तर रोखून दाखवा. सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक शासन आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा जाहीर निषेध करीत आहोत, असे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER