मनसेकडून शिवसेनेची पोलखोल; मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी नियम तोडल्याचा आरोप

mns-shivsena

मुंबई : सध्या मुंबई शहराला कोरोना महामारीने आपल्या विळख्यात घेतले आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने देशभरात लॉक डाऊन केला असून, मुंबईत त्याची अमलबजावणी केली जात आहे. सत्तेत असलेली शिवसेना सामान्य नागरिकांना लॉक डाऊनचे नियम पाळा असे वारंवारआवाहन करत आहे. तर दुसरीकडे हीच शिवसेना नियमांना तुडवत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी एक विडिओ शेअर करत हा आरोप लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आले असून, त्यांनी १८ मे रोजी आमदारकीची शपथही घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील मातोश्री या निवासस्थानाजवळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग लावले. आणि यावरूनच मनसेने शिवसेनेला लक्ष केले आहे. एकीकडे लॉक डाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे बंद असून, शिवसेनेला मात्र होर्डिंग छपाईसाठी कोणते प्रिंटिंग प्रेस उघडे मिळाले.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनतेला नियम पाळण्याचे आवाहन करतात. तर दुसरीकडे त्यांचेच नेते नियम तोडतात असा आरोप चित्रे यांनी केला आहे.

 

 

 

Source:- MNS leader Akhil Chitre Facebook live

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला