भाजप -शिवसेना पुन्हा एकत्र ; ‘या’ नगरपालिकेत केली हातमिळवणी

मुंबई : राज्यात काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेनेने (Shivsena) एकत्र येत महाआघाडी सरकार (Mahavikas aghadi) स्थापन केले . असे असतानाही वैजापूर नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुकीत पूर्वाश्रमीचे मित्रपक्ष शिवसेना व भाजप पुन्हा एकत्र आले. त्यामुळे नगरपालिकेत सर्वाधिक ११ सदस्यसंख्या असलेल्या शिवसेनेकडे तीन व भाजपकडे स्थायी समितीसह चार समित्यांचे सभापतिपद आले आहे.

नगरपालिकेत शिवसेना व भाजपचे वर्चस्व असून काँग्रेसचा केवळ एक नगरसेवक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभापतिपदी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष साबेर खान अमजद खान यांची निवड झाली आहे. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे सखाहरी लक्ष्मण बर्डे, पाणीपुरवठा व जलशुद्धीकरण समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या सुप्रिया विनायक व्यवहारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख व नगरसेवक सचिन ऊ र्फ बंडू वाणी यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. क्रीडा व सांस्कृतिक विभाग समितीच्या सभापतिपदी भाजपच्या माधुरी दशरथ बनकर, नियोजन समितीच्या सभापतिपदी भाजपच्या जयश्री दिनेश राजपूत व महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी लताबाई अंकुश मगर यांची निवड झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER