शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; मुक्ताईनगरचे तब्बल १० आजी-माजी नगरसेवक शिवसेनेत

Shiv Sena's big blow to BJP

मुंबई :- एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केल्यानंतर जळगावात भाजपला (BJP) धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. एकीकडे एकनाथ खडसेंचे असंख्य समर्थक राष्ट्रवादीत गेले तर दुसरीकडे भाजपकडे असलेल्या महापालिकेची सत्ता आपल्याकडे खेचून शिवसेनेने (Shiv Sena) भाजपला मोठा धक्का दिला होता. आता शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला जोरदार धक्का दिला आहे. मुक्ताईनगरमधील भाजपच्या सात  विद्यमान आणि तीन  माजी नगरसेवकांनी  शिवबंधन बांधून शिवसेनेचा भगवा हाती धरला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत या १० आजी-माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा झाला. या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरमधील पीयूष  महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि अन्य चार जणांचा समावेश आहे. नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे जळगावात भाजपला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे.

ही बातमी पण वाचा : नवी मुंबईत मनसेचा काँग्रेसला धक्का, असंख्य समर्थकांसह काँग्रेस नेत्याचा मनसेत प्रवेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button