सत्तेसाठी शिवसेनेने विश्वासघात केला, भाजपने नाही; फडणवीसांचा आरोप

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray.jpg

मुंबई :- बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. मात्र मोठा पक्ष असूनही मुख्यमंत्री हे नितीशकुमारच राहतील आणि त्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असेल, असं भाजपने स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शब्द दिला होता आणि आम्ही तो पाळणार आहोत असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज स्पष्ट केलं.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात भाजपने असा कुठलाही शब्द दिला नव्हता. सत्तेसाठी भाजपने नाही तर शिवसेनेने विश्वासघात केला नव्हता. फडणवीस म्हणाले, आम्हाला जागा कितीही मिळाल्या तरी मुख्यमंत्री हे नितीशकुमारच राहतील असं पंतप्रधानांनी आधीच स्पष्ट केल होतं. त्यामुळे आम्ही शब्दाला जागणारे आहोत. नितीशकुमार यांची प्रतिमा ही स्वच्छ आहे. सत्तेसाठी आम्ही हपापलेले नाही असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातलं सरकार हे निरंकूश झालं आहे. आपल्याविरुद्ध बोलणाऱ्यांना, लिहिणाऱ्यांना त्यांनी जेलमध्ये टाकलं आहे. राज्यात अघोषित आणीबाणी लादली आहे असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. महाराष्ट्रातलं सरकार जावं असा प्रयत्न आम्ही करणार नाही. अशा प्रकारची सरकारं हे देशात कधीच जास्त काळ टीकली नाहीत. आपसातल्या अंतर्विरोधानेच हे सरकार कोसळून पडेल असंही त्यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : शरद पवार हे मोठे नेते आहेत  ;  ‘त्या’ खोचक टिप्पणीला फडणवीसांचे प्रत्युत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER