शिवसेनेची मोदी सरकारविरोधात बॅनरबाजी

मुंबई : देशात एकीकडे अच्छे दिन कधी येणार याची अतुरतेने सर्वसमान्य जनता प्रतीक्षा करत आहे. मात्र, दुसरीकडे पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत आहे . यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) युवा विंग म्हणजे युवा सेनेमार्फत मुंबईच्या खार, वांद्रे, सांताक्रुझ आणि इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक पेट्रोल पंप, चौकात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या (petrol-diesel-price-hike) विरोधात बॅनर (Shiv Sena banner) लावले गेले आहे.

यामध्ये 2015 आणि यानंतर 2021 पर्यंत गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती किती वाढल्या आहेत, याचा तुलनात्मक उल्लेख करत थेट मोदी सरकारवर निशाना साधला गेला आहे. इतकंच नाही तर हेच अच्छे दिन आहेत का ? असा थेट प्रश्नही विचारण्यात आला. मात्र, युवासेने तर्फे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीसाठी केंद्रातली मोदी सरकार हेच जबाबदार आहे असा आरोप करत याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या गंभीर इशारा युवा सेने तर्फे देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER