कोरोना सेंटरवरच शिवसेना नगरसेविका आणि भाजप महिला आमदारात धक्काबुक्की

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाच्या (Corona) उपाययोजनांवरून भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) कलगीतुरा रंगला आहे. अशातच आता दोन्ही पक्षांतील महिला नेत्यांमध्ये थेट कोरोना सेंटरवरच बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील कोरोना सेंटरवर हा प्रकार घडला. कोरोना लसीकरण सुरू असताना लस देण्यावरून दोन्ही पक्षांच्या महिला नेत्या समोरासमोर आल्या. यावेळी दोघींमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

भाजपच्या महिला नेत्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आज सकाळी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होता. भाजपच्या आमदार भारती लव्हेकर, नगरसेवक योगिराज दाभाडेकर आणि रंजना पाटील तसेच शिवसेना नगरसेविका राजूल पटेल उपस्थित होते. सकाळी ११ च्या सुमारास लस देण्यावरून पटेल आणि लव्हेकर यांच्यात वाद झाला. शाब्दिक चकमकीनंतर दोघींमध्ये बाचाबाची झाली आणि धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे भारती लव्हेकर या आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहचल्या आहेत. राजूल पटेल आणि हारून खान आदींनी आमच्या कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की केली.

आमच्यावर हल्ले केले. कोविडच्या काळात सत्ताधारी पक्षाकडून हल्ले होणं योग्य नाही, असं भारती लव्हेकर यांनी सांगितलं. आमच्यावर हल्ला करणाऱ्यांवर शिवसेनेने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी लव्हेकर यांनी केली आहे. तर भाजपचे आमदार आणि नगरसेवक मनपाच्या कार्यक्रमात येऊन गोंधळ घालतात, श्रेय लाटण्याचं काम करतात, असा आरोप सेना नगरसेविका राजूल पटेल यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button