अखेर युतीचे घोडे गंगेत न्हाहले; हदगांव-हिमायतनगर मतदारसंघात तिरंगी लढतीचे संकेत

माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदमांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष

BJP-Shivsena

हिमायतनगर:दत्ता शिराणे -शिवसेना, भारतीय जनता पार्टी ची युती गेल्या 30 वर्षापासूण होती. परंतु सन 2014 च्या निवडणुकीत ऐनवेळी दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. शिवसेना व भाजप ला एकहाती सत्ता मिळविता आली नाही. त्यामुळे निवडणुकांनंतर दोन्ही पक्षांनी एकञ संसार थाटून पाच वर्षे सत्ता अबाधित राखली. 2019 च्या निवडणुकीत युतीच्या संदर्भात तर्कवितर्क वर्तविले जात होते. युती होण्याची शक्यता धुसर होण्याची चिन्हे दिसून येत होती. सस्पेन्स कायम होता. अखेर युतीचे घोडे गंगेत न्हाहले. हदगांव, हिमायतनगर विधानसभेसाठी शिवसेनेकडून विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली. या विधान सभा मतदारसंघात आ. आष्टीकरांच्या बाबतीत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेचे निष्ठावंत माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी द्यावी. अशी मागणी तमाम जनतेची होती. परंतु कदमांना डावलून शिवसेनेने आ. आष्टीकरांना उमेदवारी बहाल केली. त्यामुळे गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेचे निष्ठेने काम करणारे बाबुराव कदम अतिशय नाराज झाले असून निष्ठावान शिवसैनिक आजही बाबुराव कदमांच्या पाठीमागे असल्याने कदमांच्या भूमिकेकडे आता सर्वाचेंच लक्ष लागले आहे.

हदगांव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप युतीकडून संभाव्य उमेदवार आ. आष्टीकर, माजी जिल्हाप्रमुख कोहळीकर यांची नांवे सुरूवातीपासूनच आघाडीवर आहेत. तर काँग्रेस कडून माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांच्यात विधान सभेचे तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. चर्चा अंतिम टप्प्यात आहे. भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडी ही सध्या फॉर्मात आहे. वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी या मतदार संघाचा उमेदवार घोषित केला नाही. वंचित आघाडी कडून एखादा सक्षम उमेदवार विधान सभेच्या रिंगणात उतरल्यास या मतदारसंघात तिरंगी लढत होवू शकते. काँग्रेस, राष्ट्रवादीआघाडीकडून ही अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे. संभाव्यउमेदवारात जवळगांवकर व चाभरेकर यांचा समावेश असला तरी जवळगांवकरांचे पारडे जड मानल्या जात आहे. शिवसेकडून 2014 च्या निवडणुकीत आष्टीकरांचा उदय झाला. परंतु गेल्या पाच वर्षांत विद्यमान आमदार यांनी एक ही असे काम केले नाही कि, ते जनतेच्या स्मरणात राहील? आष्टीकरांच्या बाबतीत मतदारसंघात कमालीची नाराजी आहे. हि वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. तर माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदमांनी जनतेची नाळ तोडली नाही.

सतत जनते च्या सुखदुःखात सहभागी होवून मतदारांच्या सहानुभूती सह कदम हे पाञ ठरले आहेत. प्रचंड लोकप्रियता कमाविलेल्या बाबुरावांना शिवसेनेने संधी देणे अपेक्षित होते परंतु शिवसेना पक्ष प्रमुखांनी निष्ठावंत, हाडाच्या शिवसैनिकाला डावलून अनपेक्षितपणे आष्टीकरांना संधी दिली. त्यामुळे नाराजगी पत्करून परत आलेल्या कदमांना जनतेचा उत्स्फुर्त पणे प्रतिसाद मिळत आहे. पक्षाने कदमांवर अन्याय केल्याची सल घोषणाबाजी तून व्यक्त होत आहे.

कदमांनां मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचंच लक्ष लागले आहे. एवढे मात्र निश्चित.