शिवसेनेला महिलांचा आदर करण्याची शिकवण- संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि महाराणा प्रताप यांच्या विचारांवर शिवसेना चालते. यांनी नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण दिल्याचे ट्वीट शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjya Raut) यांनी केले.

शिवसेना महिलांचा अनादर करत असल्याचे काहीजण जाणिवपूर्वक पसरवत आहेत. असे करणाऱ्यांनी मुंबई आणि मुंबादेवीचा देखील अपमान केलाय. महिलांच्या गौरवासाठी शिवसेना लढत आली. हीच शिक्षण शिवसेनाप्रमुखांनी दिली, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput) अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे. कंगनाने नुकतेच ट्वीट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला. यावरून कंगना आणि राऊत यांच्यात वादंग पेटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER