संजय राठोड राजीनामाप्रकरणी शिवसेना एकाकी, राष्ट्रवादीकने हात झटकले

NCP -shivsena-Sanjay Rathod

मुंबई: पूजा चव्हाण (Pooja Chauhan) मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर अडचणीत सापडलेले शिवसेना (Shivsena) नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला. झाल्यानं त्यांच्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव होता. त्यातच सोमवारपासून (१ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असल्यानंया मुद्द्यावरून विधिमंडळात विरोधकांकडून या विषयावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळेच अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राठोड यांचा राजीनामा घेतला.

मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असला तरीही तो अद्यापही मुख्यमंत्री कार्यालयाकडेच आहे. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवलेला नाही. यावरून भाजपनं ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. राठोड यांचा राजीनामा निव्वळ फार्स होता का, असा सवाल भाजप नेत्यांकडून विचारला जात आहे. तर राष्ट्रवादीनं याबद्दल हात झटकले आहेत.

संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडेच आहे का, तो राज्यपालांना पाठवला गेला नाही का, असे प्रश्न राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना विचारण्यात आले. त्यावर माझ्याकडे याबद्दलची माहिती नाही. ही माहिती तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळेल, असं उत्तर मलिक यांनी दिलं. त्यामुळे राठोड प्रकरणात शिवसेना एकाकी पडल्याचं चित्र आहे. काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीनं (NCP) या प्रकरणात शिवसेनेचा बचाव केलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER