सिडकोचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, सुरेश लाड यांच्या नावावर पवारांसह शिवसेनेचे एकमत ?

Maharashtra Today

नवी मुंबई : राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोकडे(CIDCO ) बघितले जाते. आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना वसाहत, मेट्रो, उरण नेरुळ रेल्वे, जेएनपीटी विस्तार, स्मार्ट सिटी यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे हे महामंडळ राष्ट्रवादीकडे जाणार असून सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड (Suresh lad)यांच्या नावावर पक्षाध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) आणि शिवसेनेत एकमत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सिडकोच्या अध्यक्षपदासाठी सध्या जोरदार लॉबिंग सुरू आहे. माजी आमदार सुरेश लाड, राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील आणि नामदेव भगत यांच्यात सिडकोच्या अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सिडकोच्या अध्यक्ष पदासाठी सुरेश लाड यांच्या नावावर पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेत एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे माजी आमदार सुरेश लाड यांचे मधुर संबंध असल्याने त्यांच्या नियुक्तीला विरोध नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पनवेल आणि उरण नवी मुंबईत या भागात राष्ट्रवादीची ताकद नसल्याने माजी आमदार सुरेश लाड यांना सिडकोचे अध्यक्षपद देऊन त्या भागात पक्ष संघटना मजबूत करण्याची रणनीती आखली जात आहे. तसेच लाड यांच्या पक्ष संघटनेच्या अनुभव लक्षात घेता त्यांना पवारांकडून ही जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा आहे.

सुरेश लाड विरुद्ध आमदार महेंद्र थोरवे असा राजकीय संघर्ष सध्या कर्जतमध्ये सुरु आहे. आमदार थोरवे यांनी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यामुळे खासदार तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोंद घेतल्याची समजते त्यामुळे तटकरे आणि अजित पवार यांनी लाड राजकीय ताकद देण्याकरिता सिडकोच्या अध्यक्षपदावर निवड व्हावी यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे.

नवी मुंबई येथील सेनेचे नेते नामदेव भगत यांनी सिडको संचालक मिळण्याकरिता सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला त्यामुळे ते सुद्धा आपली वर्णी लागावी यासाठी जोरदार प्रयत्न दिसून येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील हे सुद्धा सिडकोच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहे. आगरी समाजाचे नुकतेच प्रवेश केलेले भाजप नेते तसेच गणेश नाईक यांना शह देण्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. येत्या १५ जून पर्यत महामंडळ नियुक्त होणार असून महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे आहे, असा संदेश देण्याकरिता नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button