हाथरस प्रकरणी शिवसेना आक्रमक पवित्रा ; चर्चगेट स्टेशनबाहेर योगी सरकारविरोधात घोषणा

shiv-sena-aggressive-in-hathras-case.jpg

मुंबई : हाथरसमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर उपरादरम्यान या मुलीचा दिल्लीतल्या रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेनंतर शिवसेनेने (Shivsena) आक्रमक पवित्रा घेतला आहे .

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या विरोधात आता शिवसेनेने निदर्शनं सुरु केली आहेत. हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. तिला मारहाण करण्यात आली. मोदी सरकार हाय हाय अशाही घोषणा देण्यात येत आहेत. या निदर्शनांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेनेच्या आंदोलनात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांचाही सहभाग होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER