
कोल्हापूर : कोरोनामुळे(Coronavirus) लॉकडाऊन(Lockdown) सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अनेक आंदोलने आणि मोर्चांना सुद्धा बंदी आली. शिवसेनेने जिल्हा प्रशासनाच्या कारभाराच्या निषेध करत, जिल्ह्यातील सद्य परिस्थितीला जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरत कोल्हापुरात ‘ऑनलाईन बोंब मारो आंदोलन’ केले. आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला.
दिवसांपासून कोल्हापुरातील(Kolhapur) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावरुनच प्रशासन कोरोनाबाबतीत नियोजनात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा यावेळी शिवसेना(Shiv Sena) आंदोलकांनी केला आहे. शिवाय आरोग्य यंत्रणा सुद्धा विस्कळीत झाली असून त्याला सर्वस्वी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई(Daulat Desai) जबाबदार आहेत, असे म्हणत हे आंदोलन करण्यात आले. निषेध व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या बोंबमारो आंदोलनाचा व्हिडिओ सध्या कोल्हापुरात व्हायरल होत असून या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे हा व्हिडीओ केल्याचा प्रकार चुकीचा असून निषेध करणाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन कोरोनाबधितांची सेवा करावी, असा सूर सुद्धा उमटत आहे. व्हिडिओ करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी देखील मागणी अनेकांकडून होत आहे.