मदन शर्मांना मारहाण करणारे शिवसैनिक पुन्हा जामिनावर मोकळे

Shiv Sainik's Released On Bail

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे कार्टून पोस्ट केल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांनी (Shiv Sainik) निवृत्त नौदल अधिकाऱ्याला जोरदार मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी थातुरमातुर कारवाई करत त्यांच्यावर योग्य त्या कलमानुसार गुन्हा दाखल केला नव्हता. त्यामुळे या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला होता. मात्र भाजपने (BJP) हे प्रकरण उचलून धरत योग्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. विरोधकांकडून होत असलेला दबाव लक्षात घेता आज पोलिसांना परत एकदा अटक केली होती. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना आजही जामीन मंजूर केला.

राज्यात गुंडाराज सुरू असून राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता या प्रकरणात सर्वच स्तरांवरून दबाव वाढत असल्याने आज पोलिसांनी त्या सहाही शिवसैनिकांना पुन्हा अटक केली. मात्र आजही त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER