कारमधून पिस्तुलीचा धाक दाखवणारे शिवसैनिक नव्हते, गृहराज्यमंत्र्यांचा खुलासा

Shambhu Raje Desai-Shivsena

मुंबई :  मुंबई – पुणे महामार्गावर (Mumbai Pune Highways) एकाने वाहतुकीतून मार्ग काढम्यासाटी चक्क पिस्तुलिचा धाक दाखवून आपली कार पुढे नेण्याचा प्रताप केला होता. या प्रकरणी त्या दोघांना अखेर अटक करण्यात आली आहे. मात्र ट्रॅफिकमध्ये पिस्तुल (Pistol) दाखवणारे ते शिवसैनिक (Shivsena) नव्हते चुकीच्या पद्धतीने शिवसेनेवर टीका करण्यात आली, असा खुलासा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई (Shambhu Raje Desai) यांनी केला आहे.

‘कारमध्ये जे दोन तरुण पिस्तुलीचा धाक दाखवत होते ते मुळात शिवसैनिक नव्हते. उगाच आरोप करायचा म्हणून चुकीच्या पद्धतीने ते आरोप करण्यात आले होते’ असं शुंभाराजे यांनी सांगितलं. असे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे.

दरम्यान, पिस्तुलीचा धाक दाखवून ट्र्ॅफिकमधील इतर वाहनचालकांना चक्क पिस्तुल दाखवून एक कार व हातात पिस्तुल असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता. त्या व्हिडिओत त्या कारच्या मागे शिवसेनेचा लोगोही पुसटसा दिसत होता.

याबाबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील एक व्हिडीओ ट्वीट करून सांगितले. यात एका कारमधील तरुण पिस्तुलीचा धाक दाखवून जात होते. गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यामुळे जलील यांनी शिवसेनेवर आरोप केला होता. परंतु, त्यांच्या या आरोपाला राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी उत्तर दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER