शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचे लायसन्स मिळालं आहे का? निलेश राणेंचा सवाल

Nilesh Rane-Shivsena

मुंबई :- मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर (एक्सप्रेस-वे वरील) बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या शिवसैनिकांचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी या प्रकरणामध्ये कारवाई करण्याची मागणी केलेली असतानाच आता भाजपाचे नेते निलेश राणे (Nilesh rane) यांनी हाच व्हिडीओ शेअर करत, शिवसेनेच्या (Shivsena) लोकांना महाराष्ट्रामध्ये दादागिरी करण्याचे लायसन्स मिळाले आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

ही बातमी पण वाचा : अनेक संघर्षातून निर्माण झालेला मुंबई-गोवा महामार्ग टोल मुक्त व्हावा : निलेश राणे

निलेश राणे यांनी व्हायरल झालेला व्हिडीओ आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करत या प्रकरणासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचे लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?, असे ट्विट निलेश यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER