उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र : शिवसैनिकांनी भाजपा कार्यकर्त्याच्या तोंडाला फासले काळे

BJP Shirish Katekar Pandharpur

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर आक्षेपार्ह आणि एकेरी भाषेत टीका केल्याने शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांकडून पंढरपूरमधील (Pandharpur) भाजपाचे (BJP) माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर (Shirish Katekar) यांच्या तोंडाला काळं फासत त्यांना साडी नेसवल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे भाजपाकडून शिवसेनेवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे.

हा प्रकार म्हणजे शिवसेनेची सत्तेची मस्ती आणि गुंडगिरी असल्याचे भाजपाने या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. भाजपाच्या सरचिटणीस आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

व्हिडीओत शिरीष कटेकर यांना शिवसेनेचे काही कार्यकर्ते घेरतात आणि त्यांच्या अंगावर डोक्यावर काळी शाई ओतताना दिसत आहेत. तसेच भरबाजारातून त्यांची धिंड काढताना त्यांच्या गळ्यात माळसदृश वस्तू घालताना आणि अंगावर साडी टाकतानाही दिसत आहेत. आक्रमक झालेले हे कार्यकर्ते कटेकर यांना मारहाण आणि शिवीगाळही करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER