मुख्यमंत्र्यांविरूद्ध वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांना शिवसैनिकांकडून आपल्या स्टाईलने उत्तर

Shivsena

यवतमाळ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यावरून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे शिवसैनिकांनी चांगलाच गोंधळ घातला. तसेच पोस्ट टाकणाऱ्या दोघांच्या दुकानांमध्ये सकाळी १० च्या सुमारास जाऊन तोडफोड केली.

सकाळी १० वाजताच्या सुमारास विश्‍वास नांदेकर कार्यकर्त्यांसह नांदेपेरा मार्गावरील सतीश पिंपळे यांच्या रसवंतीमध्ये गेले आणी साहित्याची तोडफोड केली. तेथून त्यांनी आपला मोर्चा जटाशंकर चौकात असलेल्या विवेक पांडे यांच्या मोबाईल शॉपीकडे वळवला. तेथेही शिवसैनिकांनी दुकानातील साहित्याची तोडफोड केली. ही माहीती मिळताच ठाणेदार वैभव जाधव ताफ्यासह तेथे पोहोचले.

ही बातमी पण वाचा : पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोना युद्धात अडथळे आणीत आहेत – शिवसेना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानजनक पोस्ट केल्यानंतरही शिवसैनिक गप्प कसे, अजून काहीच कसे केले नाही, आतापर्यंत शिवसेना स्टाईलने उत्तर कसे दिले गेले नाही, शिवसेनेची आक्रमकता गेली कोठे, असे एक ना अनेक प्रश्‍न काल लोकांमध्ये विचारले जात होते. २४ मे च्या रात्री पिंपळे व पांडे या दोघांवर गुन्हा दाखल केल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी दोघांनाही कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती. मात्र काल दिवसभरातही कारवाई न झाल्याने आज शिवसैनिकांच्या संयमाचा बांध फुटला. आज सकाळी १० वाजताच्या सुमारास विश्‍वास नांदेकर कार्यकर्त्यांसह नांदेपेरा मार्गावरील सतीश पिंपळे यांच्या रसवंतीमध्ये गेले आणी साहित्याची तोडफोड केली. तेथून त्यांनी आपला मोर्चा जटाशंकर चौकात असलेल्या विवेक पांडे यांच्या मोबाईल शॉपीकडे वळवला. तेथेही शिवसैनिकांनी दुकानातील साहित्याची तोडफोड केली. ही माहीती मिळताच ठाणेदार वैभव जाधव ताफ्यासह तेथे पोहोचले. याप्रकरणी माजी आमदार विश्वास नांदेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य शिवसैनिक फरार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER