जळगावातील असेही शिवसैनिक; पत्नी महापौर तर पती विरोधीपक्षनेते

Shiv Sainiks from Jalgaon - Maharashtra Today

जळगाव : जळगाव महापालिकेत सध्या अनोख्या राजकारणाची चर्चा सुरू आहे. नुकताच संपन्न झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्तांतर घडवून आणले. भाजपला सत्तेपासून दूर करत महापालिकेत महाविकास आघाडी पूरस्कृत शिवसेनेचा महापौर आहे. महापालिकेच्या महापौर या शिवसेनेच्या जयश्री महाजन या आहेत. तर त्यांचे पती सुनील महाजन हे महापालिकेत विरोधी पक्षनेते आहेत. विशेष म्हणजे दोघं शिवसेनेतर्फे निवडून आले आहेत. आताही ते शिवसेनेतच आहेत. पण पत्नी शिवसेनेची महापौर तर पती शिवसेनेचाच विरोधी पक्षनेता आहे

जळगाव महापालिकेत पाहापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताबदल झाल. शिवसेनेने भाजपचे नगरसेवक आपल्या जाळ्यात ओढून सत्ता प्राप्त केली. त्यानंतर शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी विराजमान झाल्या. त्यावेळी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे होते. महाजन यांचे पती सुनील महाजन विरोधी पक्षनेते होते ते आजही आहेत. त्यामुळे एकाच घरात महापालिकेतील महापौर आणि विरोधी पक्ष नेता ही दोन्ही पदे आहेत.

शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या पत्नी महापौर झाल्या. तर शिवसेनेकडे तांत्रिकरित्या विरोधी पक्षनेतेपद आहे. त्यामुळे सुनील महाजन हेच विरोधी पक्षनेते आहेत. सत्तांतर झाल्यानंतर जळगाव महापालिकेची पहिली महासभा ऑनलाईन आज होत आहे. पत्नी महापौर जयश्री महाजन व्यासपीठावर असतील तर पती सुनील महाजन विरोधी पक्षनेते असतील. भाजपकडून आद्यापही विरोधी पक्षनेते पदाचा दावा केला गेलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button