शिवसैनिकांनी अडवला देवेंद्र फडणवीसांचा ताफा

Devendra Fadnavis Convoy Blocked By Shivsainiks

जळगाव :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातलं होतं. यात केळी बागांसह घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी शिवसैनिकांनी (Shiv Sena) फडणवीसांचा ताफा अडवला.

गेल्या आठवड्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील मोदाळदे गावातील १८० घरं पडली आहेत. त्यामुळे सध्या गावातील नागरिक बेघर झाले आहेत. फडणवीसांनी बेघर झालेल्या नागरिकांची भेट घेत शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

ही बातमी पण वाचा : जळगावात भाजपला मेगागळती थांबणार ; अखेर देवेंद्र फडणवीस मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना भेटले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button