‘शिवसेनेचे स्तुत्य कार्य, उस्मानाबादमधील शिवसैनिक कोरोना वॉरियर म्हणून कार्यरत’

Shivsena

उस्मानाबाद :- कोरोनाचा (Coronavirus) वाढता संसर्ग रोकण्यासाठी ‘ठाकरे’ सरकारने ब्रेक दि चेन अभियानाअंतर्गत १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध घातले आहे. सरकारच्या या कार्यात आता उस्मानाबादचे शिवसैनिकही (Shivsena) मोठा हातभार लावणार असून कोरोना वॉरियर म्हणून कार्य करणार आहेत. या अभियानात ,१ मे पर्यंत शहरांपासून ते गावपातळीवरील शिवसैनिक हे कोरोना वॉरियर म्हणून कार्यरत होतील. रुग्णांची संख्या कमी होण्याच्या दृष्टिकोनातून जनजागृतीसोबतच नागरिकांच्या अडचणीच्या वेळेला मदतीसाठी धावून जाण्यास शिवसैनिक या अभियानातून तत्पर राहतील, अशी माहिती आ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी गुरुवारी दिली.

कोरोनाचा उद्रेक वाढत असताना प्रशासनाचा कारभार संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. शिवाय लोकप्रतिनिधींनाही सहकार्य मिळत नाही. यामुळे गरुवारपासूनच प्रशासनाच्या सोबतीने शिवसैनिक गावपातळीवर कामाला लागतील. प्रशासन व लोकप्रतिनिधीतील समन्वय वाढीस लावण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. यातून कोरोनाची चेन ब्रेक करणारा महाराष्ट्रातील क्रमांक एकचा जिल्हा म्हणून उस्मानाबादची नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यापासून ते त्यांच्यावर व्यवस्थित उपचार होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोविड सेंटरच्या माध्यमातून मोठी मदत उभी केली आहे. शिवाय, औषधी कमी पडत असल्यास ती स्वखर्चाने उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही सावंत यांनी दिली. यावेळी खा.ओम राजेनिंबाळकर, आ.ज्ञानराज चौगुले, आ.कैलास पाटील, जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, युवासेनेचे राज्य विस्तारक सूरज साळुंखे उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : कोरोनाचे नियम शिवसेनेसाठी नाहीत? काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकींचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button