‘शिवसैनिक माझा श्वास’ फक्त भाषणात! आणि नंतर… – राणेंचा ठाकरेंना टोमणा

Nilesh Rane & Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यामध्ये कोरोना विषाणू संकटाची परिस्थिती उद्भवल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घराबाहेर पडत नाहीत, असा आरोप भाजपाचे नेते सतत करतात. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एक नवा आरोप लावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेकदा फोन केल्यानंतरही तो स्वीकारत नाहीत आणि भेटतही नाहीत, अशी तक्रार एका शिवसेना (Shivsena) आमदाराने केल्याचा दावा राणे यांनी केला.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद ; शिवसेना नेत्याची टीका 

राणे यांनी याबाबत ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली. ‘एका शिवसेना आमदाराची अशी परिस्थिती असेल तर सामान्य शिवसैनिकांची अवस्था किती बिकट असेल ह्यावरून लक्षात येते. फक्त भाषणातून सांगायचं शिवसैनिक माझा श्वास आहे, नंतर शिवसैनिक फाट्यावर.’ असा टोमणा मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER