मातोश्रीशेजारीच शिवसैनिकाने क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करून साजरा केला वाढदिवस

Shiv Sena - Cricket Tournament

वांद्रे येथील शिवसैनिक (Shiv Sena) कुणाल सरमलकर यांनी आपला वाढदिवस क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करून साजरा केला. यावर त्यांनी खुलासा केला की, त्यांनी आयोजकांना फक्त ‘आर्थिक पाठबळ’ दिले.

रविवारी आणि सोमवारी एका बॉक्स क्रिकेट स्पर्धेत शेकडो मुले पार्कबाहेर क्रिकेट खेळताना दिसली. सामाजिक अंतर, मुखवटा हे नियम न पाळता ती क्रिकेट खेळत होती. तेही मातोश्रीपासून साधारण १०० मीटर अंतरावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नजरेदेखतच ही टुर्नामेंट सुरू होती. वाढदिवसानिमित्त शिवसैनिकाने ही क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केली होती.

एकीकडे खरंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र अनलॉक करण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगतात. तसेच कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी आपले सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असा त्यांचा आग्रह असतो. एवढेच नाही तर, आपल्या प्रत्येक भाषणात ठाकरे हे मुखवटा घालून सामाजिक अंतर राखण्याची गरज असल्याचे पुन्हा पुन्हा सांगत असतात.

तर दुसरीकडे एका शिवसैनिकाकडूनच क्रिकेटसारख्या खेळाचे आयोजन करण्यात आल्याने शिवसेनेवर टीका होत आहे. दिवाळी प्रीमियर लीग नावाची ही स्पर्धा वांद्रे पूर्व येथील आशापुरा सोसायटीजवळ ओपन लँड येथे आयोजित करण्यात आली होती. ठाकरे निवासस्थान मातोश्रीपासून अगदी हाकेच्या अंतरावर हे ठिकाण असतानाही ठाकरे सरकारने केलेल्या अनलॉक मार्गदर्शक तत्त्वांचे संपूर्ण उल्लंघन होत आहे, ज्यांनी क्रीडा कार्यक्रम आणि धार्मिक मेळाव्यावर बंदी घातली त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याने अशा प्रकारच्या सामूहिक खेळाचे आयोजन करावे यासाठी शिवसेनेवर टीका होत आहे.

शनिवारच्या तुलनेत रविवारी आणखी मोठ्या प्रमाणात खेळाडू खेळताना दिसले. एवढेच नाही तर या स्पर्धेचे उद्घाटन सेनेच्या कार्यक्रमाच्या रूपात करण्यात आले असून उद्धव, आदित्य ठाकरे आणि सेनेचे मंत्री अनिल परब यांचे पोस्टर्सदेखील लावण्यात आले होते. सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, वांद्रे पूर्व येथील अनेक सोसायट्यांमधील मुले या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

शिवसैनिक कुणाल सरमलकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन केल्याचे सांगण्यात येते. सेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमालकर यांचे पुतणे कुणाल सरमलकर यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला नाही; केवळ आर्थिक साहाय्य केले. “ही स्पर्धा परिसरातील तरुणांनी आयोजित केली होती आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी माझे नाव बॅनरवर लावले.” असे कुणाल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कुणाल म्हणाले, होय, मी ट्रॉफी आणि रोख बक्षिसे खरेदी करण्यास आर्थिक साहाय्य केले; परंतु मी आयोजक नाही. त्यांनी मला आमंत्रित केले आणि मी माझ्या वाढदिवसासाठी आणलेला केक कापण्यासाठी गेलो.”

दरम्यान, भाजपचे (BJP) नेते महेश पारकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “सेना नियमांचे उल्लंघन करण्यासाठीच ओळखली जाते.स्पर्धेच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे घर आहे; परंतु याला परवानगी देण्यात आली. या कार्यक्रमात भाग घेणा-यांना कोरोनाची लागण झाली आणि सुपर स्प्रेडर्समध्ये रूपांतर केले तर कोण जबाबदार असेल? ” असा सवाल पारकर यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER