शिवजयंती राष्ट्रोत्सव सोहळ्यात १० देशांचे राजदूत

Shiv Jayanti

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याप्रमाणे राजधानी दिल्लीतही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची वैश्विक जयंती आज राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात साजरी झाली. या जयंती कार्यक्रमात बारा देशांचे राजदूत सहभागी झाले.

फडणवीसांच्या काळातील वृक्षलागवड कितपत यशस्वी?; ठाकरे सरकारचा चौकशीचा बडगा

या राजदूतांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले. तर बल्गेरियाच्या राजदूत इलेन वोरा यांनी मराठीत भाषण करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. महाराष्ट्र सदनामध्ये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्र सदन हे हे फुलांनी सजविण्यात आले होते. सोबतच नाशिकचे ढोल पथक आणि लेझीम पथकाने जयंती कार्यक्रमात रंगत आली. लष्काराच्या मराठा रेजिमेंटचा बँड महाराष्ट्र सदनात वाजवण्यात आला. शिवजन्माच्या सोहळ्यासाठी शिवाजी महाराजांचा पाळणा देखील सजविण्यात आला होता. छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रोत्सवाच्या पहिल्या वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत, नौदलप्रमुख सुनील लांबा तर, दुसऱ्या वर्षी लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्षा सुमित्रा महाजन सहभागी झाल्या होत्या. तर शिवजयंती राष्ट्रोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.