समुद्राखाली भगवा फडकवून शिवरायांना युवकांकडून आगळे-वेगळे अभिवादन

Shiv Jayanti greetings

औरंगाबाद : दरवर्षी शिवजयंतीचा उत्साह देशभरात पहायला मिळतो. शिवरायांचा प्रत्येक भक्त आपापल्या परीने आपल्या भावना शिवजयंतीला अभिवादनातून व्यक्त करत असतो. यावर्षी काही युवकांनी समुद्राखाली ४५ मिनीटे भगवा फडकवून रयतेच्या राजाला अभिवादन करण्याचा वेगळा प्रयाेग केला. हे सागरी अभिवादन अंदमान येथील हॅवलॉक (स्वराज द्वीप) येथे करण्यात आले. आशिया खंडातील सुंदर पाच बीचपैकी एक असलेल्या राधानगर बीच येथे स्वानंद उदय माने, रतीश कुलकर्णी आणि अमोल ससे या स्कुबा इन्स्ट्रक्टर असलेल्या औरंगाबादेतील युवकांसह अंदमान येथील सुधाकर बिस्वास, सुकांतो सेन, लुचिया कुजुर, उमेश गुप्ता, मनोज मिस्त्री, संतोष ससे आणि सुरेश मंडल यांनी समुद्राखाली ४५ मिनिटे थांबत भगवा झेंडा फडकवून शिवरायांना अभिवादन केले.

शिवजयंतीसाठी औरंगाबादहून कुरिअरद्वारे पाठ‌वण्यात आले होते झेंडे.

अंदमान येथून ५७ किमी अंतरावर असलेल्या स्वराज द्वीप येथे शेलो डाइव्ह ग्रुप आणि सीलिंक स्कुबा ग्रुप यांच्यातर्फे सलग दुसऱ्या वर्षी या शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. राधानगर बीच पाण्याची उत्कृष्ट दृश्यता (पारदर्शकता) असलेले भारतातील सर्वोत्कृष्ट बीच आहे. १२ युवकांनी गेल्या १५ दिवसांपासून या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. शिवजयंतीसाठी लागणारे झेंडे हे औरंगाबादहून कुरिअरद्वारे पाठ‌वण्यात आले होते.

शिवजयंतीदिनी मुनगंटीवारांनी केले ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे’ उड्डाणपुलाचं उद्घाटन