कोल्हापूरच्या चौघांना शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार

कोल्हापूर : राज्य शासनाने क्रीडा क्षेत्रातील राज्याचा सर्वोच्च शिव छत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली असून त्यात अ‍ॅथलेटिक्समध्ये सांगलीचे क्रीडा मार्गदर्शक युवराज बाळू खटके तर कोल्हापुरातील पॅराअ‍ॅथलेटिक्सचे मार्गदर्शक अनिल पोवार यांचा समावेश आहे. त्यांच्यासह जिल्ह्यातील चार जणांचा यादीत समावेश आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहकार्याने शिक्षण, आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरण – उपमुख्यमंत्री

शासनाने यंदा जीवन गौरव पुरस्काराने पुण्याच्या पंढरीनाथ तथा अण्णासाहेब पठारे यांचा गौरव करायचे निश्चित केले आहे. कोल्हापूरचे दिव्यांग जलतरणपटू स्वप्नील संजय पाटील यांना यंदा शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आला आहे. याशिवाय टेबल टेनिसपटू वैष्णवी विनायक सुतार आणि बेसबॉलपटू गिरीजा बोडेकर यांचाही या यादीत समावेश आहे. एकूण 63 जणांना हे पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये 48 खेळाडूंपैकी 23 पुरुष तर 25 महिला, पाच क्रीडा मार्गदर्शक, चार साहसपटू आणि चार दिव्यांग खेळाडू यांचा समावेश आहे.