आता १४ जूनपर्यंत ‘शिवभोजन थाळी’ मोफत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई :- राज्यात १ जूनपर्यंत ठाकरे सरकारकडून (Thackeray Govt) लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ योजनेची सुरुवात केली. ही प्रक्रिया राज्यभर सुरू आहे. या कालावधीत गरजू लोकांना जेवणाअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गरिबांचे हाल होऊ नये, यासाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवभोजन थाळीची तारीख वाढविली आहे. आता १४ जून २०२१ पर्यंत मोफत असणार, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळाले नाही. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी १ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘शिवभोजन थाळी’ १४ जूनपर्यंत मोफत असणार आहे, अशी घोषणा केली. राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ‘शिवभोजन थाळी’ देण्याचे जाहीर करण्यात आले. सुरुवातीला ही थाळी १० रुपयांमध्ये देण्यात येत होती. मात्र, कोरोना काळात ती ५ रुपयांना देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने राज्यात संचारबंदी लागू करताना शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली. राज्यात आतापर्यंत ४८ लाखांहून अधिक नागरिकांना मोफत जेवणाचा लाभ मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button