शिर्डीत बंद तर परभणीत ‘सद्बुद्धी दे’ कीर्तन

- पाथरी , साईबाबांच्या जन्मस्थानाचा वाद

नागपूर :- परभणी जिल्ह्यातील पाथरी गावाचा साईबाबांचे जन्मस्थान उल्लेख रद्द करा, या मागणीसाठी आजपासून शिर्डी येथे बेमुदत बंद सुरू झाला. त्याचवेळी, शिर्डीकरांनी पाथरीला साईबाबांचे जन्मस्थान मानण्याच्या मागणीला असलेला विरोध सोडावा यासाठी त्यांना ‘सद्बुद्धी दे’ कीर्तन परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले.

दरम्यान, शिर्डी बंदमुळे गावातील हॉटेल बंद आहेत. आज रविवारची सुट्टी असल्याने शिर्डीत भक्तांची गर्दी झाली आहे. साई संस्थांच्या ‘भक्त निवास’मधील १५०० खोल्या आरक्षित झाल्या आहेत. भक्त निवासात खोली मिळावी म्हणून रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी भक्तांसाठी चहा आणि नास्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी बेमुदत बंद, तोडगा निघेपर्यंत माघार नाही

पाथरी येथील साई भक्तांचे म्हणणे आहे की आमचा शिर्डीच्या दर्जाला काहीही विरोध नाही. मात्र शिर्डीकरांच्या – पाथरी गावचा साईबाबांचे जन्मस्थान उल्लेख रद्द करा, या भूमिकेला आक्षेप आहे. शिर्डीकरांनी ही मागणी सोडावी यासाठी त्यांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी परभणीत जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ‘सद्बुद्धी दे’ कीर्तन सुर आहे.

या वादाचे कारण असे की साईबाबांच्या चरित्रात कुठेही त्यांच्या जन्मस्थानाचा उल्लेख नाही. मात्र, सात – आठ गावांबाबत, ती साईबाबांचे जन्मस्थान आहेत अशी जनभावना आहे त्यात पाथर्डी प्रमुख आहे. गेल्या काही वर्षात साईबाबांचे जन्मस्थान म्हणून पाथर्डीला मान्यता मिळू लागली आहे. तिथे भक्तांची गर्दी वाढते आहे. पाथर्डीच्या विकासासाठी निधी देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पाथर्डीचा उल्लेख ‘साईबाबांचे जन्मस्थान’ असा केल्याने पाथर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थानाच्या दाव्याला वजन प्राप्त झाल्याने शिर्डीकर अस्वस्थ झाले आहेत व त्यांनी, मुख्यमंत्र्यानी पाथर्डीचा ‘साईबाबांचे जन्मस्थान’ उल्लेख रद्द करावा अशी मागणी करत आजपासून शिर्डी बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला शिर्डीच्या परिसरातील २५ पेक्षा जास्त गावांनाही पाठिंबा दिला आहे.