भोकर : शिंगारवाडीची शाळा झाली डिजिटल

Digital School

भोकर : तालुक्यातील शिंगारवाडी येथील जि प शाळेला लोकसहभाग धावून आल्यामुळे मागील वर्षात रंगरंगोटी झाली, अभ्यासक्रमाने भिंती ही बोलक्या झाल्या आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त दि. 26 जानेवारी रोजी ही शाळा डिजिटल झाली असून या डिजिटल शाळेचे उदघाटन प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर एल मुधोळकर यांनी केले.

मागील काही वर्षांपासून भोकर तालुक्यातील अनेक शाळा डिजिटल होत आहेत. यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा जसा उपयोग होत आहे तसा लोकसहभाग, शिक्षक सहभाग ही कामाला येतोय. शिंगारवाडी येथील शाळेच्या भिंती बोलक्या करण्यासाठी पन्नास हजार रुपये लोकसहभागातून उभे राहिले. यामुळे या शाळेला नवे रूप मिळाले आहे. दि 26 जानेवारी रोजी या शाळेच्या डिजिटल वर्गखोलीच उदघाटन आर एल मुधोळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

बिलोली: शिक्षणा सोबत संस्कार असतील तरच शिक्षणाला महत्त्व. -पत्रकार गोविंद मुंडकर

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती निता रावलोड तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुलोचना चिकटे, केंद्रप्रमुख बी जी पडलवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर डांगरे, उपाध्यक्ष क्रांती यदले, सुरेश मुपडे, अनिल शिरसाट, बालाजी पल्लेवाड, गोविंद जिलेवाड, भोजन्ना यदले, सिमा मोगे, पत्रकार अनिल जाधव, शिवशंकर मंठाळकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी सभापती निता रावलोड यांनी अध्यक्षीय समारोप करताना या शाळेच्या यशस्वी वाटचाली बाबत कौतुक केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एल एम फुलारी, सुत्रसंचलन शेळके तर आभार काकडे यांनी माणले. या वेळी शाळेच्या प्रांगणात वनपरिक्षेत्र अधिकारी कविता रामगुंडेवार, पी आर वेलमे, वनपाल गीता राठोड, गोवर्धन जाधव, कृष्णादास दाचावार, बालाजी पल्लेवाड, बालाजी करेवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.