राज्यपालांनी १२ आमदारांची यादी जाहीर करावी, शिवसेना मंत्र्याची मागणी

Eknath Shinde

ठाणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी सादर केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नावांना मंजुरी दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. त्यानंतर दोन दिवस झाले असले तरीही राज्यपालांनी अद्याप नावे जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी १२ आमदारांची यादी जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीवरही भाष्य केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता “राज्यपालांची भेट कुणीही घेऊ शकतो.

मराठा क्रांती मोर्चासोबत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आंदोलन केले. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे. मराठा आरक्षणाला जी अंतरिम स्थगिती दिली आहे, ती उठविली गेली पाहिजे. आरक्षण टिकविण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदनिशी काम करत आहे. त्यासाठी वकिलांची फौज सरकारने उभी केली आहे. मराठा आरक्षण कार्यसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांचा राजीनामा मागून काही लोक राजकारण करत आहेत. त्यांनी राजीनामा मागण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, मेट्रो कारशेडचा फायदा ठाणे, कासारवडवली, मिरा-भाईंदर, गायमुख, कल्याण, भिवंडी शहरांना होणार आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जागा राज्य सराकरची आहे. त्यावर तशा नोंदीही आहेत. या जागेसंदर्भात तत्कालीन महसूल मंत्र्यांकडे जे अपील केले होते. ते फेटाळण्यात आले आहे. राज्य सरकारने त्याठिकाणी मेट्रो कारशेडचे काम सुरु केले आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER