शिल्पा शिंदे आता वेबसीरीजमध्ये दिसणार

Shilpa Shinde

भाभीजी घर पर है या हिट मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली आणि ‘बिग बॉस 11’ (Big Boss 11) ची विजेता शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) काही दिवसांपूर्वी चांगलीच चर्चेत आली होती. शिल्पा शिंदेने एक मालिका सोडताना खूप आरोप केले होते आणि निर्मात्यानेही शिल्पा शिंदेवर आरोप केले होते. शिल्पा शिंदे मालिकांनंतर आता वेबसीरीजध्येही पदार्पण करीत आहे. शिल्पा ‘पौराशपुर’ नावाची एक वेबसीरीज करीत असून यात ती एका महाराणीची भूमिका साकारीत आहे. स्वतः शिल्पानेच सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.

वेबसीरीज आणि त्यातील भूमिकेबाबत बोलताना शिल्पा शिंदे ने सांगितले, या प्रोजेक्टसचा भाग बनताना मला खूप आनंद होत आहे. ओटीटी प्लँटफार्मवर प्रसारित होणाऱ्या वेबसीरीजमध्ये ही एक अत्यंत ताजी अशी कथा आहे. यात मी राणी मीरावतीची भूमिका साकारीत असून याला अनेक शेड्स आहेत.

या वेबसीरीजमध्ये मिलिंद सोमण, अन्नू कपूर, फ्लोरा सैनी, शहीर शेख हे कलाकारही भूमिका साकारीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER