पहिल्यांदा आई बनली तेव्हा शिल्पा शेट्टी खचून गेली होती

Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी 45 वर्षांची झाली असली तरी तिने स्वतःला चांगले मेंटन केले आहे. तिच्याकडे पाहून तिच्या वयाची कल्पनाच येत नाही. एक मुलगा असतानाही या वर्षीच्या सुरुवातीला शिल्पाने सरोगसीच्या माध्यमातून या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारीमध्ये एका मुलीला घरी आणले होते. या मुलीचे नाव समिषा ठेवण्यात आले आहे. समिषा आता नऊ महिन्यांची झाली आहे. मुलांबाबत बोलताना शिल्पा म्हणते, लोकं काय म्हणतात याचा विचार मी आता करीत नाही. 10 वर्षांपूर्वी मी जशी होते तशी आता राहिली नाही. मी योगा करीत असल्याने माझ्यात खूप बदल झाला आहे.

शिल्पाने पुढे सांगितले, आई बनण्याचा तो अनुभव खूप कठिण होता. जेव्हा पहिल्यांदा मी आई बनले आणि मुलगा विवानला जन्म दिला तेव्हा मी पूर्णपणे खचून गेले होेते. कारण मी पहिल्यांदाच आई बनले होते. परंतु आता मी 45 वर्षांची आहे. मला आठ वर्षांचा एक मुलगा आहे आणि आता माझ्यात हिम्मतही आहे. म्हणूनच मी सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म देऊ शकले. मी जेव्हा 50 वर्षांची होईन तेव्हा माझी मुलगी 5 वर्षांची झालेली असेल. लोकं काय म्हणतील याची मी आता चिंता करीत नाही आणि कोणाच्या काही म्हणण्याने मला फरकही पडत नाही. एका आईच्या रुपात मला जे करणे शक्य आहे ते सर्व मी चांगल्या पद्धतीनेच करणार आहे.

शिल्पा सध्या समिषासोबत खूप वेळ घालवत असून सोशल मीडियावर ती दोघींचे फोटो सतत शेअर करीत असते. शिल्पाचा मुलगा विवानही समिषावर खूप प्रेम करीत असल्याचे फोटोतून जाणवते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER