चाळीशी पार केलेल्या शिल्पाचे मोनोकिनीत मोहक दर्शन

Shilpa Shetty

चाळीशीनंतर महिला शक्यतो आधुनिक कपडे घालत नाहीत. कारण तोपर्यंत त्यांचे शरीर बऱ्यापैकी अवाढव्य झालेले असते. पण बॉलिवुडमध्ये काम करणाऱ्या काही नायिका मात्र फिगरवर लक्ष ठेऊन असतात. फिगर मेंटेन राहावी यासाठी योगा करण्यासोबतच खाण्यापिण्यावरही त्यांन बंधने घालून घेतलेली असतात. त्यामुळे पन्नाशीतही या नायिका तरुण दिसतात.

अशा नायिकांमध्ये शिल्पा शेट्टीचा क्रमांक फार वरचा आहे. शिल्पा शेट्टी आता 45 वर्षांची आहे पण तिने ठेवलेला फिटनेस पाहाता तिच्या वयाच्या अनेक महिलांना ती जळवत असते. याच शिल्पाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मोनोकिनीतील फोटो टाकलेले असून तिचे हे फोटो फॅन्सना प्रचंड आवडले असून ते मोठ्या प्रमाणावर लाईकही केले गेले आहेत.

खूप काळानंतर शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) ब्लॅक प्रिंटेड मोनोकिनी (हा बिकिनीचाच एक प्रकार असतो. मात्र बिकीनी टू पीस किंवा वन पीसमध्ये असते. मोनोकिनी हा पूर्ण ड्रेस असतो.) मधील दोन फोटो शेअर केले आहेत. शिल्पा सध्या गोव्यामध्ये असून ती नवे वर्ष साजरे करण्यासाठी संपूर्ण कुुटंबासह गोव्याला गेलेली आहे. या फोटोत शिल्पा शेट्टी उन खाताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना शिल्पाने लिहिले आहे, ‘जुन्या मान्यता तोडण्याच्या मूडमध्ये मी आहे.

त्यामुळे बुधवारी वीकेंडचा आनंद घेत आहे.’ तर दुसऱ्या फोटोला कॅप्शन देताना शिल्पाने लिहिले आहे, ‘उन खात आहे आणि थंड हवेचा आनंदही घेत आहे. हे असे क्षण आहेत जे मी थांबवू इच्छिते.’ फोटोतील शिल्पाचा फिटनेस पाहून जॅकलीन फ़र्नांडिस चकित झाली असून तिने तिला ‘गॉडेस’ म्हटले आहे. जॅकलीनने कमेंट्स देताना म्हटले आहे, ‘ओह माय गॉड! तू तर देवी आहेस.’ यावर शिल्पाच्या पतिने राज कुंद्राने ‘ती फक्त माझी आहे’ अशी कमेंट टाकली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER